E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
Samruddhi Dhayagude
01 Jun 2025
हगवणे पिता-पुत्राच्याही कोठडीत वाढ
पुणे
: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी नीलेश चव्हाण याला नेपाळ सीमेवर अटक केल्यानंतर पोलिसांनी शनिवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने नीलेश चव्हाण तसेच हगवणे पिता-पुत्राला ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
नीलेश चव्हाण याचा शशांक हगवणे आणि वैष्णवी यांच्या लग्न बैठकांत तसेच दोघांच्या वादविवादाते सक्रिय सहभाग होता. तसेच, वैष्णवीचे सासरे राजेंद्र आणि दीर सुशील यांच्या मदतीने सासू लता, नणंद करिष्मा यांचे मोबाईल त्याने पळविले आहेत. त्यामुळे नीलेश चव्हाण, राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना समोरासमोर बसवून त्यांची चौकशी करायची असल्याचे बावधन पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
वैष्णवी मृत्यू प्रकरणात फरारी असलेल्या नीलेश चव्हाण (वय-३४, कर्वेनगर) याला काल सकाळी न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तर, सासरे राजेंद्र हगवणे (वय-६३) आणि सुशील हगवणे (वय २७, दोघेही रा. भुकूम, मुळशी) यांना दुपारी न्यायालयात हजर केले. त्यावेळी प्रथमवर्ग न्यायदंधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी त्यांची कोठडी ३ जूनपर्यंत वाढवली.
वैष्णवीची सासू लता आणि नणंद करिष्मा हिचा मोबाईल नीलेश चव्हाणकडे देण्यात आला होता. गुन्हा घडल्यानंतर तो नेपाळला पळाला होता. त्याला पळून जाण्यासाठी मदत कोणी केली, कुठल्या मार्गाने तो तिथपर्यंत पोहोचला. वैष्णवीच्या मुलाला त्याने का ताब्यात ठेवले होते. या गुन्ह्यातील पूर्वीचे आरोपी आणि चव्हाणमध्ये झालेले संभाषण चॅटिंगचा तपास करायचा आहे. राजेंद्र आणि सुशील हगवणे यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या वस्तूंबरोबर हुंडा म्हणून रोख रकमेसह इतर वस्तू घेण्यात आल्या आहेत. ते जप्त करायच्या असल्याने पोलिस कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी अनिल विभूते आणि सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. तर फिर्यादीच्या वतीने शिवम निंबाळकर यांनी काम पाहिले.
बचाव पक्षाच्या वतीने बाजू मांडताना स्वानंद गोविंदवार यांनी सांगितले की, नीलेश हा हगवणे कुटंबियांचा नातेवाईक नसल्याने त्याला या गुन्ह्यात अटक करणे बेकायदेशीर आहे. नीलेशकडे सह आरोपीचे मोबाईल असू शकतात, ही तपास यंत्रणांनी बिनबुडाची भूमिका आहे. चव्हाण हा हगवणे कुटुंबाला मदत करीत होता. म्हणून त्याला आरोपी करण्यात आले आहे. चव्हाण हा त्याच्यावर दाखल गुन्ह्यांत नेहमीच पोलिसांना सहकार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
चव्हाणने इतर आरोपींच्या मदतीने वैष्णवीचा छळ केला
नीलेशकडे परवानाधारक शस्त्र आहे. त्याचा वापर करून त्याने वैष्णवीला छळ करण्यासाठी धमकावल्याची शक्यता आहे. नीलेश हा वैष्णवीची नणंद करिश्माच्या जवळचा मित्र आहे. शशांक, सुशील आणि राजेंद्र हगवणे यांच्यासोबत नीलेशचे आर्थिक संबंध असून, याचा तपास करायचा आहे, अशी बाजू सरकारी वकिलानी न्यायालयात मांडली.
Related
Articles
घराच्या बाल्कनीत खेळताना दुसर्या मजल्यावरून पडूनही चिमुकली बचावली!
13 Jun 2025
मैद्याची बिस्किटे कुत्र्यांच्या जीवावर
16 Jun 2025
वाचक लिहितात
13 Jun 2025
प्रणव घोलकर,नशा रेवसकर यांची विजेतेपदावर मोहोर
13 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
अहिल्यानगरमध्ये वादळी वार्यासह जोरदार पाऊस
12 Jun 2025
घराच्या बाल्कनीत खेळताना दुसर्या मजल्यावरून पडूनही चिमुकली बचावली!
13 Jun 2025
मैद्याची बिस्किटे कुत्र्यांच्या जीवावर
16 Jun 2025
वाचक लिहितात
13 Jun 2025
प्रणव घोलकर,नशा रेवसकर यांची विजेतेपदावर मोहोर
13 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
अहिल्यानगरमध्ये वादळी वार्यासह जोरदार पाऊस
12 Jun 2025
घराच्या बाल्कनीत खेळताना दुसर्या मजल्यावरून पडूनही चिमुकली बचावली!
13 Jun 2025
मैद्याची बिस्किटे कुत्र्यांच्या जीवावर
16 Jun 2025
वाचक लिहितात
13 Jun 2025
प्रणव घोलकर,नशा रेवसकर यांची विजेतेपदावर मोहोर
13 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
अहिल्यानगरमध्ये वादळी वार्यासह जोरदार पाऊस
12 Jun 2025
घराच्या बाल्कनीत खेळताना दुसर्या मजल्यावरून पडूनही चिमुकली बचावली!
13 Jun 2025
मैद्याची बिस्किटे कुत्र्यांच्या जीवावर
16 Jun 2025
वाचक लिहितात
13 Jun 2025
प्रणव घोलकर,नशा रेवसकर यांची विजेतेपदावर मोहोर
13 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
अहिल्यानगरमध्ये वादळी वार्यासह जोरदार पाऊस
12 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक